किंग खानचे मनसुद्धा मोठे

किंग खान फक्त नावानेच किंग नाही तर, तो मनानेसुद्धा किंग आहे. या त्याच्या स्वभावाची नुकतीच प्रचीती आली. या निम्मिताने तो एक चांगला मित्र असल्याचे ही त्याने दाखवून दिले आहे. काही दिवसापूर्वीच एसआरकेने वासु भगनानीचा प्रॉब्लम काही सेकंदातच दूर केली.

वासु आणी शाहरूखच्या सिनेमाचे टायटल एकच होते. त्याचे सर्व काही राइट्स सुरुवातीपासून एसआरकेच्या कंपनीकडे होते. ही गोष्ट वासुला सामजल्यानंतर काय करावे त्याला समजले नाही. त्यानंतर वासूने एसआरकेची भेट घेऊन झालेला प्रकार त्याला सांगितला. त्यामुळे सुरुवातीला काय करायाचे याची कल्पना त्याला आली नाही. काही वेळानंतर मात्र शाहरुखने माघार घेत त्याच्या टायटलला ग्रीन सिग्नल दिला. वासुच्या या सिनेमाचे टायटल ‘रंगरेज’ आहे. या सिनेमाला प्रियदर्शन डायरेक्ट करीत आहे. या सिनेमात जैकी भगनानी आणि प्रिया आनंद प्रमुख रोल करीत आहेत. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या लीड कैरेक्टर्स सोबत टायटलचे नाव जुळले आहे. त्यामुळे या सिनेमाचे टायटल चेंज करणे सिनेमाच्यादृष्टीने नेगेटिव झाले असते. त्यामुळेच वासुने रिस्क न घेता सरळ शाहरुख सोबत चर्चा केली. त्यामुळे त्याला सहजपणे टायटल मिळवता आले.

वासुला शाहरुखच्या कंपनीने नो ऑब्जेक्शन लेटर दिले आहे. याबाबत बोलताना वासु म्हणाला की, ‘होय, सर्व काही लवकर मैनेज झाले. त्यामुळे आता मला लवकरच काम सुरु करता येणार आहे. गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे.’