प्लॅस्टीक सर्जरी – वेगाने वाढत चाललेला उद्योग

अपघातात जखमी होऊन विद्रूपता आलेल्या, भाजल्यामुळे विद्रूपता आल्यास अथवा शस्त्रक्रियेमुळे शरीरावर आलेल्या खुणा नष्ट करण्यासाठी प्लॅस्टीक सर्जरी प्रामुख्याने केली जाते असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे असे म्हणावे लागेल. कारण जगभर आज प्लॅस्टीक सर्जरी हा मोठा उद्योगच बनला असून त्यात प्रामुख्याने सौंदर्यवर्धनासाठी अशा शस्त्रक्रिया करणार्यां ची संख्या प्रचंड मोठी आहे. अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या व्यवसायात होत असून जगातील २० देशांत हा व्यवसाय वेगाने वाढताना दिसून आले आहे असे इंटरनॅशनल  सेंटर फॉर अॅस्थेनिक प्लॅस्टीक सर्जरीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

या देशांची यादीही या संस्थेने दिली असून त्यानुसार पहिल्या क्रमांकावर कोरिया या देश असून तेथे अशी शस्त्रक्रिया करणार्यां चे प्रमाण दरहजारी २० आहे. येथे वर्षाला साधारण ७,७०,००० प्लॅस्टीक सर्जरी केल्या जातात. दुसरया क्रमांकावर ग्रीस असून तिसरया क्रमांकावर आहे इटाली. या दोन्ही देशांत हे प्रमाण हजारी १६ व १३ असे आहे. त्यापाठोपाठ चवथ्या क्रमांकावर ब्राझील असून तेथे हे प्रमाण हजारी १० आहे. कोलंबिया पाचव्या स्थानावर असून तेथे हे प्रमाण हजारी ११.७ इतके आहे व तेथे वर्षात ४लाख ९० हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

अमेरिकेचा नंबर सहावा आहे तर त्यापाठोपाठ तैवान, जपान, फ्रान्स, मेक्सिको, कॅनडा, व्हेनेझुएला, नेदरलँडस, स्पेन, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्थान, जर्मनी, सौदी अरेबिया, अर्जेंटिना, रोमानिया या देशांचा क्रमांक लागतो.