सानिया-शोएबची डान्स रिहर्सल

रियल लाइफ मधील कपल आता ‘नच बलिये’ या शो मधून झळकणार आहे. या शो मधून ठुमके लावताना टेनिस स्टार सानिया मिर्जा आणि तिचा पति शोएब मलिक दिसणार आहेत. यामुळेच सध्या दोघेपण इंडियात रिहर्सल करण्यात बिजी आहेत. या दोघासाठी पण डान्स शोचा एक्सपीरियंस बिलकुल नवीन असणार आहे.

याबाबत बोलताना सानिया म्हणाली, ‘ यापूर्वी केवळ लग्नाच्या संगीत पार्टीमध्ये डान्स केला आहे. त्यासाठी सुद्धा प्रैक्टिस करावी लागली होती. शोएब मात्र चांगला डान्सर आहे. त्याला डान्स करण्याची आवड आहे. मात्र तसे पहिले तर मी थोडीसी लाजाळू आहे. खेळाडु असल्याने दोघाचेपन बॉडी कॉर्डिनेशन चांगले आहे. आम्ही दोघेपण स्टेप आठवनीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.’

तसे पाहिले तर शोएब सुद्धा डान्सच्या बाबतीत नवीन खेळाडू आहे. दोघानीपण डान्स करताना खूप इंजॉय केला आहे. शोएब म्हणाला, ‘ मी कुठलेपण काम चांगल्या पद्धतीने करीत असतो. सध्या मी मन लावून रिहर्सल करीत आहे. त्यासाठी मला भारतात सपोर्ट आणि प्रेम सुद्धा मिळत आहे. त्यामुळे सध्या मी डान्सवर लक्ष केंद्रित केले आहे.’

आता टीवी वर तर आगामी काळात हे कपल डान्स करताना झळकणार आहे. मात्र आगामी काळात सिनेमात काम करण्याबाबत काही ठरविले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर डान्स रिहर्सल सोबतच खेळाची प्रैक्टिस सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.