पाक संघाला भारतात खेळू देणार नाही: शिवसेना

मुंबई: पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा ही लाजीरवाणी बाब असून महाराष्ट्रात कुठेही भारत पाकिस्तान क्रिकेट सामने खेळू देणार नाही; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मिसबाह उल हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ शनिवारपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय अणि २ टी -२० सामने खेळविले जाणार आहेत.

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना मदत करणे बंद करीत नाही; तोपर्यंत पाकिस्तानशी क्रीडा, सांस्कृतिक संबंधही ठेऊ नये; अशी शिवसेनेची भूमिका असून पहिल्यापासूनच शिवसेनेचा या दौऱ्याला विरोध आहे. या दौऱ्यात पाक संघ ज्या ज्या ठिकाणी जाईल; त्या त्या ठिकाणी त्यांना तीव्र विरोध केला जाईल; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Leave a Comment