‘मला फासावर चढवा’; बलात्कार्‍याची कबुली

नवी दिल्ली: होय; मी दोषी आहे. मला फासावर चढवा; अशा शब्दात दिल्ली येथे बसमध्ये झालेल्या बलात्कारातील एका आरोपीने न्यायालयात कबुली दिली. फळे विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या पवन गुप्ता याने ही कबुली दिली आहे.

सिनेमा बघून मित्रासह घरी निघालेल्या युवतीवर बसमध्ये सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करून चालत्या बसमधून फेकून देण्यात आले. या प्रकरणी ६ संशयितांपैकी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले.

व्यायामशाळेत सहाय्यक म्हणून काम करणारा दुसरा आरोपी विनय शर्मा याने आपण मुलीच्या मित्राला मारल्याची कबुली दिली. मात्र मुलीला हातही न लावल्याचा दावा त्याने केला. अटक केलेल्या तिघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. चौथ्या आरोपीला विहारमधील औरंगाबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment