अत्याचारग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाचा पुढाकार

मुंबई: बलात्कार अणि एसिडफेकीसारख्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना राज्य सरकार मार्फत कायदेशीर मदत, वैद्यकीय उपचार अणि मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.

अत्याचारग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने एक महत्वपूर्ण योजना आखण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेनुसार अत्याचारग्रस्त महिलेला २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अत्याचाराची तक्रार दाखल होताच संबंधित महिलेला तातडीने २० हजार रुपये दिले जाणार असून त्यामुळे तिला वैद्यकीय उपचार करून घेण्यास मदत होणार आहे. त्यानंतर दोन हप्त्यात ५० हजार अणि एक लाख३० हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. ही योजना मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले

या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. ही समिती अत्याचारग्रस्त बेनक खात्यात मदत निधीची रक्कम जमा करेल. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात येईल.

Leave a Comment