‘मतोश्री’चा प्रत्येक मजला ठाकरे यांच्या सुनांना प्रदान

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्युपत्राद्वारे मातोश्री या आपल्या निवासस्थानाचे विभाजन केले आहे. मात्र त्यात इतर दोघी सुनांना वाटा दिल्याबद्दल रश्मी ठाकरे नाराज असल्याचे वृत्त आहे.

बाळासाहेबांनी केलेल्या मृत्युपत्राचे वाचन रविवारी ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मृत्युपत्रात ठाकरे यांनी मातोश्रीचा पहिला मजला जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मित यांना; दुसरा मजला बिंदुमाधव ठाकरे यांच्या पत्नी माधवी यांना आणि तिसरा मजल रश्मी, उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. तळमजल्यावरील जागा शिवसेनेच्या कामासाठी वापरली जावी; असे मृत्युपत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment