बलात्कार्‍याला होणार फाशीची शिक्षा

नवी दिल्ली: दिल्लीतील पाशवी सामुहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या दृष्टीने कायद्यात बदल करण्यात येणार आहे. केवळ १५ दिवसात सुधारीत कायद्याचा मसुदा तयार होणार असून तो तातडीने अमलात आणला जाणार आहे. बलात्काराचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी दहा फास्ट ट्रेक न्यायालये स्थापन करण्यासही गृह विभागाने परवानगी दिली आहे.

रविवारी दिल्लीत एका बसमध्ये युवतीवर झालेल्या बलात्कारामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकाराबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. नागरिकांनी या निर्घुण प्रकारचा निषेध करण्यासाठी संसदेवर मोर्चाही काढला.

या पार्श्वभूमीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.

Leave a Comment