जम्मू काश्मीर प्रशासकीय सेवेत अनेक माजी दहशतवादी

श्रीनगर दि.१९ – जम्मू काश्मीर शासनाच्या प्रशासकीय विभागात अनेक महत्त्वांच्या पदावर , तसेच पोलिस दलात आणि न्यायविभागात महत्त्वाच्या न्यायाधीश पदांवर पूर्वी दहशतवादी असलेल्या अनेक तरूणांच्या नेमणूका झाल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अर्थात या सेवांसाठी घेतल्या जाणार्‍यां राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत या तरूणांनी अत्युच्च यशही मिळविले आहे. हायर ज्युडिशिअरी परिक्षेतील या वर्षी प्रथम आलेल्या उमेदवाराची नेमणूक सीआयडी व्हेरिफिकेशन न आल्याने फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि या मुळेच वरील बाब उघड झाली.

वरीष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांकडे या संदर्भात चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार सिव्हील सव्र्हिसेस मध्ये अधिकारी असलेला एक उत्तर काश्मीर भागात नोकरीत असून तो हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता आणि या संघटनेने त्याला स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. स्फोटातच त्याचा डावा हात निकामी झाला होता. १९९९च्या बॅचचा मध्य काश्मीरमध्ये पोस्टींग असलेला अधिकारीही हिज्बूलचा हस्तक होता तर न्यायव्यवस्थेत आणि महानगरपालिकेत इंजिनिअर असलेला अधिकारी अपहरण प्रकरणात तुरूंगवास भोगून आलेला आहे. एकाने तर माजी मुख्यमंत्री गुलाबनी आझाद यांच्या भावाचेच अपहरण करून खंडणी उकळली होती. नव्याने भरती होत असलेल्या अनेक अधिकार्यांअचे सीआयडी व्हेरिफिकेशन अद्यापी संबंधित विभागांकडे गेलेले नाही.

ही बाब ज्या उमेदवारामुळे उघडकीस आली आहे, तो अल जिहाद संघटनेचा उपप्रमुख होता. त्याने अनेक दहशतवादी कृत्यात भाग घेतला आहे मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश परिक्षेत तो प्रथम आला आहे. अर्थात दहशतवादी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या निवडीला अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतला असून सुप्रिम कोर्टाने त्याच्या निवडीवर आणलेला स्टे उठविला आहे. दुसर्यास उमेदवाराचे भवितव्य फेब्रुवारीत ठरणार आहे असेही या वरीष्ठ अधिकार्‍यांने सांगितले.

Leave a Comment