इजिप्तचा राजा रामसेस तिसरा उर्फ दुसरा फेरॉ याचा गळा चिरून खून करण्यात आला होता असे नवीन फोरेन्सिक विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. कैरो येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेल्या या फेरॉच्या ममीचा सीटी स्कॅन नुकताच करण्यात आला तेव्हा ही बाब स्पष्ट झाली.
दुसऱ्या फेरॉचा झाला होता खून
राजा रामसेस तिसरा याचा खून झाला की तो नैसर्गिक रित्या मरण पावला याविषयी शेकडो वर्षे इतिहास अभ्यासकांत वाद झडत आहेत. या ममीच्या गळ्याभोवती बँडेजेस आहेत मात्र ममी खूपच जुनी असल्याने ती खराब होऊ नये यासांठी ही बँडेजेस कधीच काढण्यात आली नव्हती. मात्र आता या बँडेजना हात ही न लावता सीटी स्कॅन करण्यात आला तेव्हा या राजाच्या गळ्यावर खूप खोल आणि रूंद घाव असल्याचे दिसून आले. याचाच अर्थ त्याचा गळा चिरून खून करण्यात आला असावा. हे रहस्य आता उघड झाल्याने या राजाच्या मृत्यूबाबतच्या शंकाकुशंकाना पूर्णविराम मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजघराण्यातील प्राचीन कागदपत्रे यापूर्वीही इतिहास संशोधकांनी तपासली आहेत. त्यावरून ११५५ बीसी मध्ये राजा रामसेस तिसरा याचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले होते मात्र ही हत्या यशस्वी झाली की हा राजा त्यातून सहीसलामत बचावला याचा उलगडा संशोधकांना होत नव्हता. इन्स्टिट्यूट ऑफ ममी अॅन्ड आईसमन संस्थेतील तज्ञ डॉ. अल्बर्ट झिंक यांनी सीटीस्कॅन केला तेव्हा वरील बाब उजेडात आली. झिक म्हणाले की या राजाच्या ममीखाली आणखी एक अज्ञात सांगाडी सापडला होता.हा सांगडा तरूणाचा असावा हे स्पष्ट झाले होते.हा सांगाडा रामसेस तिसरा याचा मुलगा पेंटावर याचा असल्याची दाट शक्यता आहे कारण सांगाड्याची डीएनए तपासणी केल्यावर संबंधित व्यक्ती रामसेसची रक्ताची नातेवाईक होती हे स्पष्ट झाले आहे.
