जानेवारीनंतर करणार राणी लग्न

सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा सीजन आहे. दोन माहिन्यापूर्वी आघाडीची नायिका करीना कपूर ही सैफ अली खान सोबत विवाहबद्ध झाली. त्यानंतर विद्या बालन आणि सिद्धर्थ कपूर यांनी पण लग्न केले आहे. त्यामुळे सध्या राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. पण हे दोघेपण जानेवारीनंतर लग्न करणार आहेत. रानीने अजून तिच्या लग्नाची डेट मात्र फाइनल केलेली नाही.

काही दिवसापूर्वी यश चोप्रा यांच्या शोकसभेवेळी आदित्य चोप्राच्या सोबत कपल सारखी रानी मुखर्जी दिसली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून इंडस्ट्रीमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सूर आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, रानीने आदिला लग्नासाठी ‘तलाश’ सिनेमाची रिलीज होण्याची वाट पाहण्यास सांगितली होती. त्यामुळे ‘तलाश’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे कपल जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे अशा अफवा पसरविण्यात आल्या होत्या.

मात्र रानीने लग्न कधी करायचे आहे हे अजून ठरविले नाही. त्याबाबात ती काही क्लियर बोलत नाही. याबाबत अधिक माहित देताना तिचा स्पोक्सपर्सन म्हणाला, ‘रानीने लग्नाच्या डेट बाबत आतापर्यंत काही सांगितले नाही. जानेवारी महिन्यात ती लग्न करणार आहे अशी बातमी आली असली तरी ती बातमी खरी नाही. राणीसाठी लग्न म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे रानी स्वताच तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा लवकरच करणार आहे.’

Leave a Comment