लग्नानंतर खूश आहे करीना

दोन महिन्यापूर्वी अभिनेत्री करीना कपूर हिने सैफ अली खान सोबत लग्न केले आहे. त्यानंतर तिने लगेचच कामाला पण सुरुवात केली आहे. डान्स डायरेक्टर फराह खान हिच्या मते करीना कपूर लग्नानंतर खूप प्रसन्न वाटत आहे. लग्नानंतर सुद्धा तिच्यात कोणताच बदल झालेला नाही. सध्या ती खूपच खुश दिसत आहे.

फराह खानने ‘दबंग-२’ या सिनेमातील फेविकोल या गाण्याचे डान्स डायरेक्टर म्हणून काम पहिले आहे. ‘फेविकोल से’ हे गाणे करीनावर चित्रित करण्यात आले आहे. फराह आणि करीना कपूरने या सिनेमापूर्वी कित्येकवेळा एकत्रित काम केले आहे. फराह आणि करीना कपूर हिच्यातील संबध पूर्वीपासून चांगले आहेत. त्यामुळे दोघीपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखतात.

फराह खानने नुकत्याच एका टीवी चैनलला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना फराह म्हणाली, ‘करीना अजून माझे संबध चागले आहेत.शुटच्या व्वेली आम्ही खुप गप्पा मारत असतो. लग्नानंतर ती मला खूप खुश दिसली. ती शुटच्यावेळी प्रसन्न वाटत होती. ‘फेविकोल से’ या गाण्याच्या शूटिंगवेळी करीना आणी सलमान यांचा रोल एकदम सकरात्मक वाटला. त्यामुळे ती सध्या तरी खुश आहे असे वाटते.’