अक्षयच्या ‘खिलाड़ी ७८६’ ची शानदार ओपनिंग

अक्षय कुमारच्या ‘खिलाड़ी ७८६’ या सिनेमाला शानदार ओपनिंग मिळाली आहे. हा सिनेमा जर १०० कोटीच्या पुढे गेला तर या वर्षातील अक्षय कुमारचा हा चौथा हिट सिनेमा असणार आहे. यापूर्वी यावर्षभरात अक्षयचे याआधी तीन सिनेमे हिट झाले आहेत. ‘खिलाड़ी ७८६’ या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर तीन दिवसातच ३४.२० कोटी रुपये कमविले आहेत.

या सिनेमाने पहिल्या दोन दिवसातच २१ कोटीची कमाई केली आहे. या सिनेमाने सिंगल स्क्रीनवर जबरदस्त कमाल केली आहे. या सिनेमाला काही ठिकाणी ९०% रिस्पॉंस मिळाला आहे. आर. मोहन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात अक्षय सोबतच आसिन, मिथुन चक्रबर्ती, हिमेश रेशमिया यांनी अभिनय केला आहे. या सिनेमात अक्षय कुमार हा पंजाबचा पहलवान झाला आहे. त्याचे नाव बहत्तर सिंह असून या सिनेमातील त्याच्या एक्शन आणि पंजाबी स्टाइलचे कौतुक केले जात आहे.

पाकिस्तानमधील सेंसर बोर्डने अक्षय कुमारच्या ‘खिलाड़ी ७८६’ च्या जाहिरातीवर सुद्धा बंदी घातली आहे. पाकिस्तानी सेंसर बोर्डच्या मते ‘७८६’ या अंकाला काही मुसलमान पवित्र मानतात. या सिनेमामुळे त्यांच्या भावनाला ठेच पोहचू शकते. त्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी देखिल सलमानच्या ‘एक था टाइगर’, सैफ अली खानच्या ‘एजेंट विनोद’ या सिनेमावर पाकिस्तान मध्ये बंदी घालण्यात आली होती. हिमेश रेशमियाने या सिनेमात केवळ अभिनय केला आहे असे नाही तर तय्नीच गाणे लिहले असून संगीतकार सुद्धा तोच आहे.

Leave a Comment