भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आफ्रिदीला वगळले

भारत-पाक दरम्यान २५ डिसेंबरपासून क्रिकेट मालिका सुरु होत आहे. त्यासाठी पाकिस्तान टीमची घोषणा करण्यात आली असून एक दिवसीय मालिकेच्या संघातून अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला वगळण्यात आले आहे. त्याशिवाय दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. त्या संघात मात्र आफ्रिदीची वर्णी लागली आहे. त्याशिवाय या मालिकेतून अष्टपैलू अब्दुल रझाकलाही वगळण्यात आले आहे.

कित्येक वर्षानंतर पाकचा संघ भारत दौ-यावर येत असून या मालिकेला २५ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. या दौ-यात पाक संघ तीन वनडे आणि दोन टी-२० सामने खेळणार आहे. पाक संघाच्या टी-२० चे नेतृत्व मोहम्मद हाफिज करणार आहे. तर मिसबाह- उल- हक वनडे संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. या मालिकेतून अष्टपैलू अब्दुल रझाकलाही वगळण्यात आले आहे. पहिला टी-२० सामना ५ डिसेंबरला बेगलोरला, दुसरा २७ डिसेंबरला अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. पहिला वनडे ३० डिसेंबरला चेन्नईत, तर दुसरा ३ जानेवारीला कोलकात्यात आणि शेवटचा ६ जानेवारीला दिल्लीत होणार आहे.

पाकचा टी-२० चा संघ पुढीलप्रमाणे- मोहम्मद हाफिज(कर्णधार), कामरान अकमल, नाशीर जमशेद, उमर अकमल, शोएब मलिक, उमर अमीन, शाहिद अफ्रिदी, सईद अजमल, मोहम्मद इरफान, जुनैद खान, अहमद शहजाद , उमर गुल, असद अली, जुल्फिकार बाबर आणि सोहेल तनवीर .

एक दिवसीय संघ पुढीलप्रमाणे- मिसबाह उल हक (कर्णधार), नाशिर जमशेद, अजहर अली, मोहम्मद हाफिज, युनीस खान, हॅरिस सोहेल, कामरान अकमल, सईद अजमल, वहाब रियाज, जुनैद खान, उमर गुल जुल्फिकार बाबर, अनवर अली, उमर अकमल आणि इमरान फरहत .

Leave a Comment