सिनेमा जगतामध्ये ज्याला देवाचा दर्जा दिला जातो त्या सुपरस्टार रजनीकांतचा आज वाढदिवस आहे. सुपरस्टार रजनीकांतचा जन्म कर्नाटकची राजधानी बेंगलुरू येथे १२ डिसेबर १९५० ला झाला. प्रत्येक वर्षी रजनीकांतच्या चाह्त्यच्यावतीने मोठ्या उत्साहत वाढदिवस साजरा केला जातो. या वर्षी रजनीकांतच्या वाढदिवसी १२/१२/१२ असा संयोग जुळून आला असून त्यामुळे अजून त्याचा वाढदिवस खास असा झाला आहे.
रजनीकांतच्या वाढदिवसी त्याच्या जगभरातील फैंसने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये राजीनैकांतचा प्रसिद्ध सिनेमा ‘शिवाजी’च्या ३डी वर्जनचे ग्रैंड रिलीज करण्यात येणार आहे. एवडेच नव्हे तर, फिल्म क्रिटिक आणि पत्रकार नमन रामचंद्रनने रजनी यांच्या जीवनावर आधारित ‘रजनीकांत’ हे पुस्तक लिहले आहे. या बायोग्राफीचे आज चेन्नैइमध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या करियरशी जोडले गेलेले खास डिटेल्स त्यामध्ये आहेत. त्यांच्या सिनेमाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते आता रिलीज झालेल्या सर्व सिनेमाची डीटेल्स यामध्ये आहेत. त्यांच्या बाबतीत्तील काही अशा गोष्टी त्यामध्ये समावेश करण्यात आल्या आहेत ते खूप कमी चाहत्यांना माहित आहेत.
बुधवारी रजनीकांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. त्यांच्या निवासस्थानी चाहत्यानी एकच गर्दी केली असून सर्वत्र रांगा लागल्या आहेत.