शरद पवारांवर ब्रीच कँडीत शस्त्रक्रिया

मुंबई दि.११ – केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर येथील ब्रीच कँडी रूग्णालयात सोमवारी रात्री छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत चांगली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शरद पवार यांचा उद्या म्हणजे १२ डिसेंबरला ७२ वा वाढदिवस आहे.

दहा वर्षांपूर्वी पवार यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. मात्र दहा वर्षे या रोगाशी लढा देऊन ते यातून पूर्णपण बरे झाले आहेत. सोमवारी रात्री करण्यात आलेली शस्त्रक्रिया कॅन्सरशी संबंधित नाही असे त्यांच्यावर सर्जरी करणार्याो डॉ. सुलतान प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांना शस्त्रक्रियेनंतर ब्रीच कँडी रूग्णालयातील रूम.नं ४०४ मध्ये हलविण्यात आले असून पुढील उपचार तेथे केले जात आहेत असे समजते.

Leave a Comment