राष्ट्रपतींचा वाढदिवस विशेष मुलांसमवेत

नवी दिल्ली दि.११ – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपला ७७ वा वाढदिवस आज म्हणजे मंगळवारी विशेष मुलांसमवेत साजरा केला. राष्ट्रपती भवनात या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या विशेष मुलांनी मूक बधिरांच्या साईन लॅग्वेज म्हणजे खुणांच्या भाषेत राष्ट्रगीत सादर केले. त्याचबरोबर या मुलांनी संगीत, नृत्य आणि ब्रेल लिपीतील आपली विविध कौशल्येही राष्ट्रपतींसमोर सादर केली असे राष्ट्रपती भवनातील प्रवक्त्याने सांगितले.

प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनात त्यांचा वाढदिवस साजरा होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

Leave a Comment