शत्रुघ्नला करायचाय ‘बिग बी’ सोबत सिनेमा

शॉटगन नावाने प्रसिद्ध असलेया अभिताने शत्रुघ्न सिन्हाला आता अमिताभ बच्चन सोबत काम करण्याची इच्छा आहे. दोघेपण खूप जुने दोस्त आहेत. यापूर्वी अनेक सिनेमात त्यांनी एकत्रित काम केले आहे. मात्र मधल्या काळात दोघांची इच्छा असून ही त्यांना म्हणावा तसा रोल न मिळाल्याने काम करता आले नाही. सध्या दोघासाठी एका प्रोजेक्टवर काम चालू आहे .

याबाबत बोलतना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘आम्ही दोघांनी ‘शान’ आणि ‘काला पत्थर’ या दोन सिनेमानंतर दोघांनी एकत्रित काम केले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून माझी ‘बिग बी’ सोबत काम करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. बिग बी हे एक चांगले सहकारी व उत्कृष्ट अभिनेते आहेत. हर्टवरील सर्जरीनंतर मी पहिल्यांदा बाहेर पडलो आहे. जास्त गर्दी असलेल्या कार्यक्रमात मी अजूनही सहभागी होत नाही. ‘

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा जरी राजकीय क्षेत्रात असले तरी अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाने खूपच प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले ,’ अक्षय कुमारने मला आजारी असताना त्यानी मला व्यायमाच्या बाबतीत खूप चांगल्या टिप्स दिल्या आहेत. त्या व्यायमामुळे मला चागली झोप येत असून मी दररोज सकाळी लवकर उठून फिरायला जातो.’ आरोग्याच्या बाबतीत फीट झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच अक्षय कुमार सोबत देखील एक सिनेमा करणार असल्याचे समजते.