‘तलाश’ च्या प्रमोशनसाठी मेरठमध्ये गेल्यानंतर आमिर खानने हॉरर किलिंगमध्ये मरण पावलेल्या अब्दुल हकीमची विधवा पत्नी महविशला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आमिरने याबाबतीत पोलिस अधिका-याची भेट घेतली होती. त्यानंतर काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या या महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यानंतर मुंबईला आल्यानंतर आमिर महविशला विसरला नाही. तिने त्या महिलेच्या मुलासाठी गिफ्ट दिले होते. आमिरने महविशसाठी काही गिफ्ट दिले होते. आता त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. आमिरने ‘सत्यमेव जयते’ चे को-डायरेक्टर स्वाति चक्रवर्तीकडून हकीमचे मोठे बंधु अब्दुल शाकिरच्या हाताने महविशसाठी गिफ्ट पाठविले आहे.
आमिर महविशसाठी गिफ्टच पाठवत नाही तर गेल्या काही दिवसापासून महविशची काळजीही घेत आहे. एवडेच नव्हे तर आमिरने तिला तिच्या बैंक अकाउंटबाबत विचरना केली आहे. त्या महिलेला फाइनैंशल हेल्प करता यावी हा यामागील उद्देश आहे. आमिर महविशला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्याने पोलीस आणि ऐडमिनिस्ट्रेशन सोबत कॉन्टैक्ट करून चर्चा देखील केली आहे.