असिनला दिला बंगला गिफ्ट

गेल्या काही दिवसपासून साउथ ब्यूटी असिनकडे स्माइल करण्यासाठी आता खूप कारणे आहेत. काही दिवसापूर्वी रिलीज झालेल्या तिच्या ‘खिलाडी ७८६’ या सिनेमातील अभिनयावर ती भलतीच खुश आहे. त्या सोबतच असिनच्या या सिनेमाला चांगला रीस्पोंस मिळत असल्याने तिच्या खुशीचा सध्या पारा उरलेला नाही. त्याशिवाय तिच्या एका चाहत्याने तिला बेंगलोरमध्ये बंगला गिफ्ट दिला आहे.

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार असिनच्या जीवनात तिला पसंत करणारी एक व्यक्ती आहे. त्याने असिनसाठी बेंगलुरुमध्ये एक बंगला विकत घेतला आहे. या खास असलेल्या व्यक्तीची असिन सोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे समजते. असिन कधी जर बेंगलुरुमध्ये आली तर ही खास व्यक्ती तिच्या सोबत फिरताना दिसते. सूत्रोंने दिलेल्या महितिनुसार हीच व्यक्ती असिनला नेहमीच गिफ्ट म्हणून फ्लॉवर, स्वीट्स आणि फैशन असेसरीज सुद्धा पाठवीत असते.

यापूर्वी देखील असिनचे असेच काही हार्ड फैन होते. लंडनमध्ये ‘हाउसफुल-२’च्या शूटिंगवेळी ही तिला निर्माता साजिद नाडियावालाचा मुलगा सुभानने तिला लॉलीपॉप, चॉकलेट्स, टेडीबीयर आणि गुलाबाचे फूल देखिल गिफ्ट दिले होते. त्यामुळे असीनसाठी तिचे चाहते काय काय गिफ्ट देतील हे सांगणे सध्या तरी कठीण झाले आहे.

Leave a Comment