नकरात्मक रोलसाठी घेतेय मेहनत-जैकलीन

बॉलीवुडमधील अभिनेत्री जैकलीन फर्नाडीजचा येत्या काही दिवसात ‘रेस-२’ हा बहुचर्चित सिनेमा येत आहे. त्यामध्ये ती एक आव्हानात्मक रोल करीत आहे. या नकारात्मक रोलसाठी ती सध्या खूप मेहनत घेत आहे. या सिनेमातील तिचा हा रोल सर्वाना आवडेल असाच हेआ. तिच्या कारकिर्दीतील आतापर्यतचा सर्वात जास्त आव्हनात्मक रोल असल्याने तिच्या या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.

जैकलीन मुलाखतीवेळी बोलताना म्हणाली, ‘ आतापर्यंत तिने अनेक सिनेमात काम केले. मात्र त्या सिनेमात तिने केलेले रोल हे वेगळे होते. आता मात्र नकारात्मक भूमिका करण्याचे आव्हान माझ्या समोर उभे आहे. या सिनेमातील प्रत्येक सीनसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. यामधील रोल नकारात्मक असल्याने प्रत्येक सीनवेळी खुपच बदल करावा लागत होता. त्यामुळे तिचा हा उत्साह अधिक वाढत होता.’

‘रेस-२’ या सिंनेमातील भुमिका व ‘हाउसफुल-२’ या सिनेमातील भूमिकेतील वेगळेपण काय आहे असे तिला विचारले असता, जैकलीन म्हणाली, ‘हाउसफुल-२’ या सिनेमातील अभिनय हा पार्कमध्ये केवळ फिरल्यासारखा होता. हा अभिनय करताना त्यावेळी खूपच मजा आली होती. मात्र आगमी काळात येत असलेल्या ‘रेस-२’ या सिनेमात काम करताना सारखीच रिहर्सल कारवाई लागत आहे. त्यामुळेच ‘रेस-२’ या सिनेमाकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.’