भारताला अतिआत्मविश्वास नडला

वास्तविक पाहता टीम इंडियाला खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. मात्र कर्णधार धोनी आणि टीम इंडियाला अति आत्मविश्वास नडला. त्यामुळेच भारताला इंग्लंडविरुद्धचा सामना गमवावा लागला. टीम इंडियाने खेळपट्टीवरच जास्त लक्ष केंद्रित केले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता, असे मत भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

इंग्लंडने पुन्हा एकदा टीम इंडियाला पराभूत करतात मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. या पुढील काळात नागपूर येथे होणारा सामना भारतीय संघाला जिंकावा लागणार आहे. यावेळी पुढे बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘ बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी विचार करून प्लॅन तयार केले पाहिजे. इंडिया ‘ए’ च्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. यातूनच टीम इंडियाचा नवा खेळाडू तयार होऊ शकतो. वाढत्या वयाला सचिन अपवाद ठरू शकत नाही. तो लवकरच फॉर्मात येईल आणि मोठी खेळी करेल. निवृत्तीचा निर्णय त्याचा त्यालाच घेऊ द्या.

दरम्यान, कोलकाता कसोटीत सात विकेटनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतरही कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र, कर्णधारपद सोडणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४ मध्ये भारताने कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर मात्र टीम इंडियाने भारतात खेळलेल्या सर्व मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे आगमी नागपूर येथील कसोटी सामन्यात भारतीय संघावर सामना जिंकण्यासाठी दबाव असणार आहे.

Leave a Comment