सैफ अली खान सोबत लग्न केल्यानंतर सुद्धा करीना कपूर हिंदु आहे. गेल्या काही दिवसापासून करीना कपूरने इस्लाम धर्म स्वीकारला आहे अशा प्रकारच्या अफवा सर्वत्र पसरविल्या जात आहेत. मात्र सैफ अली खानची आई शर्मिला टागोरने मात्र या सर्व अफवाच असून कारीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचे सांगितले. करीनाने धर्म बदललेला नाही मात्र ती पटौदीची बेगम आहे. सैफ अली खान हा नवाब असल्याने करीना कपूर ही बेगम झाली असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत बोलताना शर्मिला टैगोर म्हणाल्या, ‘सैफला नवाब म्हटलेले आवडत नाही. मात्र परंपरा गंभीरताने पाळली पहिजे. आपणा ज्या जागी राहतो त्याचा स्वीकार करावा लागतो. त्याला नकार देऊन चालत नाही. ‘सैफला वाटते की ही पदवी त्याच्या वडिलासाठी ठीक होती. वडिलाची जागा भरून काढणे सध्या तरी मुश्कील आहे. मला वाटते की हे सर्व काही वेळेनुसार ठीक होईल.’
ज्यावेळी सैफ अली खानचे करीना कपूर सोबत लग्न झाले होते त्यावेळी काही मंडळीनी हे लग्न अवैध असल्याचे म्हटले होते. त्यांच्या मते सैफ मुसलमान आसल्याने करीनाने इस्लाम धर्म स्वीकारवा. मात्र त्यामुळे पटौदी परिवारला काही फरक पडत नाही दोघानी पण त्याच्या मर्जीने विवाह केला आहे. त्यामुळे आता तिला करीना कपूर-खान असे म्हटले जाते.