अण्णा हजारे यांची रुग्णालयातून रवानगी

नवी दिल्ली: अशक्तपणा आणि आम्लपित्ताने आजारी असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले आहे.

अण्णांना अति ताणामुळे अशक्तपणा आला आणि आम्लपित्ताचा त्रास होत होता. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे; अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. नरेश तेहरान यांनी सांगितले.

अण्णांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दि. ७ डिसेंबर रोजी मेदांत मेडीसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.