पोलिसांना हवी झीच्या संपादकांची लाय डिटेक्टर टेस्ट

नवी दिल्ली: जिंदाल खंडणी प्रकरणात अटकेत असलेले झी न्यूजचे दोघे संपादक आणि झी वृत्त समुहाचे मालक सुभाष चंद्र यांची लाय डिटेक्टर आणि आवाजाची चाचणी घेण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे.

तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर झी न्यूजच्या संपादकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. चंद्र आणि त्यांचा मुलगा; झी समूहाचा कार्यकारी संचालक पुनीत गोयंका यांची शनिवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ९ तास चौकशी केली. कोळसा घोटाळ्याच्या बातम्या प्रसारित न करण्यासाठी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझिनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांनी जाहिरातीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये मागितल्याची तक्रार काँग्रेसचे खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी केला आहे.

झी समूहाने पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे.