भारत- चीन सीमावादावर तत्काळ तोडगा नाही: खुर्शीद

नवी दिल्ली: भारत चीन सीमा प्रश्नावर अल्पकालीन तोडगा शक्य नसल्याची स्पष्टोक्ती परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी केली. मात्र या संवेदनशील प्रश्नावर ठोस उपाय करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

भारत आणि चीन दरम्यान संवादाद्वारे सीमा प्रश्न सोडविण्यासाठी धीम्या गतीने पण ठामपणे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात त्याची फळे मिळाल्याचे दिसून येईल. मात्र या प्रश्नावर तत्काळ उपाय मिळण्याची शक्यता नसल्याचे खुर्शीद यांनी स्पष्ट केले.

भारत आणि चीन आपले संबध सुधारून एकमेकांचे महत्वाचे सहयोगी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.