‘तलाश’ च्या सक्सेसची पार्टी देणार सैफ

सैफ – करीनाच्या लग्नानंतर रिलीज झालेला बेबोचा पहिलाच ‘तलाश’ हा सिनेमा सक्सेसफुल ठरला आहे. हा सिनेमा सक्सेसफुल ठरल्याने आमिर खानने पार्टीचे आयोजन केले होते. मात्र नेमकी याच वेळी बेबो सलमान खान सोबतच्या शूटिंगमध्ये बीजी होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा सैफ-करीनाने पार्टीचे आयोजन केले आहे.

या पार्टीची स्पेशालिटी आहे की, सैफ – करीनाच्या लग्नानंतरची ही पहिली पार्टी आहे. सैफच्या जवळच्या मित्राने सांगितले की, ‘बुलेट राजा’ या सिनेमाच्या शूटिंग मध्ये बिज़ी असल्याने करीनाचा नवीन सिनेमा त्याला पाहता आला नव्हता. या सिनेमाची पार्टी त्याने इंडस्ट्रीमधील फ्रेंड्सना दिली नव्हती. त्या शुटच्या कामातून फ्री झाल्यानंतर सैफने बेबोच्या या सिनेमाच्या सक्सेस पार्टीची प्लैनिंग केली आहे.

या पार्टीमध्ये आमिर खान, रानी मुखर्जी, फरहान अख्तर, रितेश सिद्धवानी, जोया अख्तर, रीमा कागती, करण जौहर, करिश्मा कपूर, अमृता अरोड़ा, मलाइका अरोड़ा खान, प्रीति जिंटा, मनीष मल्होत्रा या सर्वाना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याशिवाय आणखीन काही मान्यवर मंडळीची लिस्ट यादी तयार आहे. त्यांना पण पार्टीचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

Leave a Comment