भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेवरही बंदी

नवी दिल्ली: भारतीय ऑलिम्पिक संघटने पाठोपाठ भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेवरही बंदीची नामुष्की ओढविली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आक्षेप घेऊन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध महासंघाने ही बंदी घातली आहे.

भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या अध्यक्ष पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अभयसिंग चौताला यांची अध्यक्षपदी निवड झाली.भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होऊनही चौताला यांनी मुष्टीयुद्ध संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेने संपूर्ण निवड प्रक्रियेलाच आक्षेप घेतला असून या निवडणुकीची चौकशी करण्यात येणार आहे.

या बंदीमुळे भारतीय मुष्टीयोध्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकावे लागणार आहे.

Leave a Comment