थेट विदेशी गुंतवणुकीची लढाई सरकारने जिंकली

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सत्ताधारी आघाडीने बाजी मारली आहे. या विजयामुळे आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सरकार अधिक वेगाने आणि आक्रमकपणे पुढे नेईल; अशी चिन्ह आहेत.

मतदानापूर्वी राज्यसभेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. समाजवादी पक्षाने मतदानापूर्वी काही काळ ‘वॉक आउट’ केले. सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सहमतीचे प्रयत्न केले नाहीत; याबाबत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मात्र सत्ताधारी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला. सरकारने या निर्णयापूर्वी बहुतेक राजकीय पक्षांचे ने ते आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केला.

मतदानाच्या वेळी समाजवादी पक्षाचे खासदार सदनातून निघून गेले तर समाजवादी पक्षाने सरकारची साथ दिली. थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाजूने १२३तर विरोधात १०९ मते पडली.

Leave a Comment