अजय करणार टायगर सोबत फाइट

आगमी काळात येत असलेल्या सिनेमात अजय देवगण हा टायगर सोबत फाइट करताना दिसणार आहे. हे ऐकून थोडेसे सर्वानाच आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. अजय हा त्याच्या सीक्वेंसमधील ‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या शूटमध्ये गेल्या काही दिवसपासून व्यस्त आहे. भारतात प्राण्यासोबतच्या शूटिंगला परमिशन मिळत नाही. त्यामुळे येत्या काळात अजय देवगण हा टायगर सोबतच्या फाइटचा सीन मॉरिशसमध्ये जाऊन शूट करनार आहे.

मॉरिशसमध्ये प्राण्यासोबतच्या शूट करण्यासाठी बंदी नसल्याने डायरेक्टर साजिद खान आणि अजय देवगण यांनी त्याठिकणी शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. या सीनचे शूटिंग मॉरिशस येथील एका फार्म हाउस मध्ये करण्यात येणार आहे. त्याठिकाणी अशा स्वरूपाच्या सीनसाठी ट्रेंड प्राणी असतात. त्यामुळे हा सीन त्याठिकाणी शूट करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा स्वरूपाचा सीन हा ‘मिस्टर नटवरलाल’ सिनेमात अमिताभ बच्चनवर चित्रित करण्यात आला होता. या यूनिटशी संबधित सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण हा सात दिवस मॉरिशसमध्ये शूटिंग साठी जाणार आहे. टायगर सोबतचे काही सीन शूट करण्यात येणार आहेत. त्यानंतर काही क्लोज सीनमध्ये बॉडी डबल्सपण यूज करण्यात येणार आहेत.

‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आगामी काळात अजय देवगण आणि टायगरमधील फाइट पाहण्यास मिळणार आहे. ही फाइट त्यांना कितपत पसंत पडते हे मात्र येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment