या वर्षीच्या सुरुवातीला दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या ‘डेंजर्स इश्क’ या सिनेमामधून अभिनेत्री करिष्मा कपूर हिने बॉलीवूडमध्ये पुनरगमन केले आहे. सध्या ती तिच्या कामावर खुश असून जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद ती घेत असून तिच्यावर कसलाच दबाव नसल्याचे तिने काही दिवसापूर्वीच दिलेल्या मुलखतीप्रसंगी व्यक्त केले.
कसलाच दबाव नाही- करिष्मा कपूर
यावेळी बोलताना अभिनेत्री करिश्मा कपूर म्हणाली, ‘ जीवनातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत आहे. सध्या मी करीत असलेल्या कामावर खूपच खुश आहे. सध्या मी खूपच शानदार स्थितित असल्याने मला पुढे जाण्याची ओढ अथवा माझ्यावर कसल्याच प्रकारच्या दबावापासून खूपच दूर आहे. मी सिनेमात काम करीत असताना माझ्या आवडीनुसार काम करीत आहे. मला पसंद पडेल असेच काम करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्याप्रमाणे मला काम देखील मिळाले आहे.’
करिश्मा कपूरने तिच्या करियरची सुरुवात १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ या सिनेमापासून केली. त्यानंतर तिने ‘अनाड़ी’, ‘राज बाबू’, ‘राजा हिन्दुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ अशा हिट सिनेमात काम केले. २००३ साली तिने उद्योगपति संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर बॉलीवुडपासून दूर झाली होती. तिच्या मुलीचे नाव समैरा असून ती सात वर्षाची आहे, तर कियान हा मुलगा दोन वर्षाचा आहे. तिने यावर्षच्या सुरुवातीला विक्रम भट्टच्या ‘डेंजर्स इश्क’ या सिनेमातुन पुनरागमन केले आहे.
