भारताचा डाव ३१६ धावावर आटोपला

ईडन गार्डन्सच्या फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीचा लाभ उठवण्यात टीम इंडियाला अपयश आले. दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मॉंटी पानेसरने झहीर खान व इशांत शर्माला बाद करीत भारताचा डाव आटोपला. धोनीने ५२ धावची खेळी करीत भारतचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही भारताचा पहिला डाव ३१६ धावावर संपुष्टात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने बिन बाद ६२ धावा केल्या होत्या.

दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ११ महिन्यांच्या अवधीनंतर अर्धशतक झळकावून आपल्याला सूर गवसल्याचे दाखवून दिले. बुधवारी पहिल्या दिवसअखेरीस पहिल्या डावात भारताची अवस्था ७ बाद २७२ अशी बिकट झाली. खेळपट्टीवर चेंडू फारशी करामत करत नसतानाही इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. जेम्स अँडरसनने चहापानानंतर चेंडू रिव्हर्स स्विंग करताना तीन बळी टिपले. अर्धशतकवीर गौतम गंभीर व सचिन यांचा अपवाद वगळता बाकीचे फलंदाज खराब फटक्यांवर बाद झाले. सचिनने त्याच्या कारकिर्दीत आणखी एक विक्रम केला असून त्याने ३४ हजार धावाचा टप्पा पूर्ण केला आहे. इंग्लडकडून मॉंटी पानेसरने चार गाडी बाद केले तर अँडरसनने तीन गाडी बाद करीत त्याला चांगली साथ दिली.

गुरुवारी सकाळच्या सत्रात भारताचा डाव कालच्या धावसंख्येत ४४ धावची भर घातल्यानंतर ३१६ धावावर आटोपला. भारताकडून धोनीने ५२ धावा करीत एकाकी झुंज दिली. त्यानंतर इंग्लंडच्या सलमीविरानी चांगली सुरुवात करताना उपहारानंतर बिनबाद ६२ धावा केल्या होत्या. कर्णधार कुकने ४५ तर क्रोमप्तप्ने १७ धावा केल्या होत्या.

Leave a Comment