‘एक था टाइगर’ सारखा ब्लॉक बास्टर सिनेमा हिट ठरल्याने गेल्या काही दिवसापासून सलमान खान भलताच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून तो याचा स्टारडम कैश करण्याचा कुठलाच मोका तो सध्या सोडण्यास तयार नाही. त्यामुळेच त्यांनी आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी आता सर्वात जास्त म्हणजेच ८० कोटी रुपये मानधन घेण्याचे ठरविले आहे.
टायगरचे मानधन आता ८० कोटी
त्यामुळेच सलमानने साजिद नाडियाडवालाच्या ‘किक’ या सिनेमासाठी ८० कोटी रुपये मानधनची डिमांड केली आहे. पूर्वी सलमानने ७० कोटी रुपयाची डिमांड केली होती. मात्र त्यानंतर अचानक १० कोटी रुपायची त्यामध्ये सलमानने वाढ केली आहे. तसे पहिले तर सलमान आणि साजिद दोघे पण चांगले मित्र आहेत. त्यामुळे याबाबत अजून दोघामध्ये चर्चा सुरु असून अजून मानधनाबाबत काहीच ठरले नाही.
सलमानच्या जवळील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्याची त्याची मार्किट प्राईस कमी आहे असे त्याला वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आगामी काळात मानधन वाढवून घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता सजिद सलमानला ८० कोटी रूपये देऊन सिनेमासाठी साइन करतो की नाही हे ओत्सुक्यचे ठरेल.
