चर्चच्या फादरना लूटून वर मागितली माफी

मुंबई दि.६ – चर्चच्या फादरना चर्चमध्येच लूटून या घटनेबद्दल वर त्यांची माफी मागण्याची घटना मुंबईत घडली. फादरना लुटणारे तिघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत असे समजते. चोरट्यांनी या लूटीत रोख रक्कम आणि सोने असा २ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या संबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवघर, भाईंदर पूर्व भागातील सॅक्रेड हार्ट कॅथॉलिक चर्चचे फादर डेलिस फ्रन्सिस मुरूकी यांना चर्चमध्येच वॉचमन म्हणून काम करणार्याक तिघाजणांनी लुटले. सोमवारी रात्री फादर त्यांच्या खोलीत असताना सहा महिन्यांपूर्वीच रूजू झालेला वॉचमन दीपक भंडारी यांने दरवाजा वाजवला. फादरनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांने फादरचा आशीर्वाद हवा असे म्हणून आत प्रवेश केला. त्याच्यामागून अन्य दोघा वॉचमननीही आत प्रवेश करून फादरला मारहाण केली व खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर कपाट उघडून रोक रक्कम व १८ ग्रॅम सोने लुटले. नंतर दीपक  फादरच्या पायाशी बसला आणि चोरीबद्दल माफ करावे असे म्हणून माफी मागितली. नंतर हे तिघेही फादरच्याच पल्सर मोटरसायकलवरून पळून गेले. त्यानंतर फादरनी स्वतःची सुटका करून पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांनी केलेल्या तपासात भंडारी हा हिस्टरी शिटर असल्याचे व यापूर्वीही त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे आढळले. चर्चमध्ये नोकरीवर ठेवताना संबंधित अधिकारी नोक रांची पूर्ण चौकशी न करताच नोकर्या  देतात असेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment