सलमान खानने केला शाहरुख, रितीकचा मजाक

‘जब तक है जान’ या सिनेमाच्या प्रीमियर मध्ये  सलमान खान सहभागी झाल्यानंतर शाहरुख खान व त्याच्या मधील वाद मिटला असे बोलले जात होते. मात्र ‘बिग बॉस’ सीजन ६ मधील एक एपिसोड पाहिल्यानंतर या दोघातील वाद मिटला ही एक अफवाच वाटत आहे. सलमान खानने या शो मध्ये ‘तलाश’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सहभागी झालेल्या करीना कपूरच्या मदतीने शाहरुख खान व रितीकवर निशाना साधला आहे.

‘बिग बॉस’ च्या शो मध्ये गेस्ट म्हणून करीना कपूर सहभागी झाली होती. सलमान खानने त्यावेळी तिला काही प्रश्न विचारले.  या प्रश्नाचा बहाणा करू त्याने शाहरुखवर काही वार केले.  सलमानने करीनाला सर्वात इंटेलिजेंट खान कोण आहे ? असा प्रश्न केला होता त्यावर करीनाने  आमिर खान असे उत्तर दिले. त्यावर सलमानने हसत हसत करीना सिनेमात ज्या खान सोबत काम करते त्याचेच नाव घेते. ‘तलाश’ मुळे ती आमिरचे नाव घेत आहे. ‘बॉडीगार्ड’ आल्यानंतर माझे नाव घेत होती. ‘बॉडीगार्ड’ च्या पूर्वी जो सिनेमा आला आहे त्याला तुम्ही विसरून जावा असे सांगितले. ‘बॉडीगार्ड’च्या पूर्वी करीनाचा शाहरुखसोबतचा ‘रा वन’ हा सिनेमा आला होता. ‘रा वन’ सिनेमा प्रेक्षकाने नाकारला होता.

यावेळी सलमानने करीनाला अनेक प्रश्न विचारले. यावेळी त्याने आमिर खान, सैफ अली खान आणि त्याच्या बाबतीत चर्चा केली मात्र शाहरुखचे नाव घेणे टाळले. सलमानने करीनाला चांगला डान्सर कौन आहे असा प्रश्न  विचारला होता. त्यवेळी तिने रितिकचे नाव घेतल्यानंतर सलमानने ‘कहो न प्यार है’ मधील पॉप्युलर डान्सच्या स्टेप्स करीत रितीकचा देखील मजाक उडविला.

Leave a Comment