कसाबच्या फाशीचे केले शूट

सिने निर्माता राम गोपाल वर्मा गेल्या काही दिवसापासून मुम्बईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘द अटैक्स ऑफ २६/११’ सिनेमा निर्मिती करीत आहे. त्या सिनेमासाठी नुकतेच त्याने फाशीचे दृश्य शूट केले आहे. हा सीन शूट केला असल्याची माहिती नुकतीच राम गोपाल वर्मा यांनी प्रसारमध्यामाशी बोलताना दिली.

वर्माने याबाबतीत टि्वटरवर लिहले आहे की, ‘ कसाबच्या फाशीचे दृश्य शूट केले असून निश्चित ही एक सर्वाना अचंबित करणारी घटना आहे. २६/११ चा आरोपी असलेल्या कसबाला फाशी देण्यात आल्यानंतर एका आठवड्यानंतर हे सीन शूट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून वर्मा हे ‘द अटैक्स ऑफ २६/११’ या सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे.

हा सिनेमा मुम्बई येथील २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. याघटनेतील एक मात्र हल्लेखोर असलेल्या अजमल आमिर कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसाना यश आले होते. त्याला चार वर्षानंतर म्हणजेच २१ नोवेंबर रोजी फाशी देण्यात आली. हा सीन देखील राम गोपाल वर्माने या सिनेमामध्ये समाविष्ट केला आहे. या सिनेमात अभिनेता नाना पाटेकर आणि संजीव जयसवाल यांनी मुख्य रोल केला आहे.

Leave a Comment