
सलमान, शाहरुख सोबतच आता आमिर खान देखील आता १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. आमिर खानचा बहुचर्चित ‘तलाश’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सध्या धूम माजवीत आहे. या सिनेमाचे गेल्या तीन दिवसाचे कलेक्शन ५० कोटीच्या जवळपास आहे.

सलमान, शाहरुख सोबतच आता आमिर खान देखील आता १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. आमिर खानचा बहुचर्चित ‘तलाश’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सध्या धूम माजवीत आहे. या सिनेमाचे गेल्या तीन दिवसाचे कलेक्शन ५० कोटीच्या जवळपास आहे.
दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आमिर खानने सध्या मात्र धूम माजवली आहे. मिस्टर परफेक्शनिस्टने बॉलीवुडचा बादशाह आणि टायगर खानच्या सोबत १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करीत काही कमी नसल्यची जाणीव करून दिली आहे. आमिरच्या ‘तलाश’ या सिनेमाने तीन दिवसात ५० कोटीचा आकडा पार केला आहे. ट्रेड एनालिस्ट्सच्या मते रविवारचे पूर्ण आकडे आल्यानंतर ‘तलाश’ चे कलेक्शन ५० कोटीच्या पुढे जाणार आहे. आगामी काळात या सिनेमाचे कलेक्शन याच प्रमाणात राहिले तर पाच दिवसात हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल असे वाटते .
आमिरला मात्र अजून त्याचा हा सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल की नाही यावर विश्वास बसत नाही. मात्र त्याची ही इच्छा मात्र प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत पूर्ण केली आहे. आमिरचा ‘तलाश’ हा सिनेमा शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. शुक्रवारी बॉक्स ऑफिस १४.५२ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. तर शनिवारी ‘तलाश’ने बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपयेची कमाई केली आहे. दोन दिवसात ३१.५२ कोटी रुपये कमाई केली आहे. रविवारी १९ कोटी रुपयेची कमाई केली असल्याने तीन दिवसात ५० कोटीची कमाई झाली आहे. आगामी काळात अक्षयकुमारच ‘खिलाड़ी ७८६’ हा सिनेमा रिलीज झाल्यानतर ७ डीसेंबरपासून कमाई मात्र दोन्ही सिनेमात वाटली जाणार आहे.