ग्रामपंचायतीने महिलांवर लादली मोबाईल बंदी

पाटणा: बिहारमधील एका ग्राम पंचायतीने महिलांच्या सेल फोन वापरण्यावर प्रतिबंध जारी केले आहेत. हा नियम मोडणाऱ्या महिलांकडून दंडापोटी मोठ्या रकमा वसूल करण्याचा ठरावही ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर केला आहे.

बिहारमधील सुंदरबाडी या गावाच्या ग्रामसभेने महिलांना सेल फोन वापरण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अविवाहित युवतींनी सेल फोन वापरल्यास त्यांच्यावर १० हजार रुपये; तर विवाहित महिला घराच्या बाहेर येऊन सेल फोनवरून संभाषण करताना आढळल्यास तिच्याकडून २ हजार रुपये दंड वसूल करण्याचा ठराव या ग्रामसभेने मंजूर केला आहे.

महिलांनी रस्त्याच्या कडेला स्नान करू नये असा ठरावही सुंदर बाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे.