मुंबई कसोटी सामन्यात पराभव स्वीकारवा लागल्याने काहीशा चिंतीत असलेल्या टीम इंडियाने सोमवारी कलकत्ता येथिल हिरवे गवत दिसत असलेल्या इडन गार्डन मैदानावर कसून सराव केला. सरावादरम्यान कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी अशोक दिंडा आणि इशांत शर्माच्या गोलंदाजीवर खास लक्ष ठेवले होते. त्या सोबतच दुस-या कसोटीत अवसानाघातकी फलंदाजीमुळे भारताला नामुष्की स्वीकारवी लागली होती. त्यामुळे खेळाडूनी फलंदाजीवरपण विशेष लक्ष केंद्रित केले होते. मुंबई येथील पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे.
मुंबई येथील कसोटी सामना चौथ्या दिवशी सकाळीच संपला होता. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना गेल्या आठवड्यात सुटी मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंनी सरावाला सुट्टी घेणेच पसंत केले होते. इंग्लंड संघानेही आराम घेतल्यानंतर रविवारपासून इडनवरील सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई येथील कसोटी सामाना जिंकल्याने इंग्लंड संघात सध्या चैतन्याचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात सुट्टी असल्याने भारतीय संघातील खेळाडूनी घरी जाऊन विश्रांती घेणेच पास्नात केले होते. सुट्टीनंतर ते रविवारी वेगवेगळ्या विमानांनी कलकत्ता येथे दाखल झाले आहेत. रविवारी सांयकाळी संघाची बैठक झाली. त्यामध्ये या स्माय्चीरान्निती ठरविण्यात आली असलायचे समजते. या बैठकीला कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात कसून सराव केला.