मोदी पंतप्रधान पदास पात्र: सुषमा स्वराज

गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून ते देशाचे पुढील पंतप्रधान होण्यास पात्र असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले.

गुजरातच्या निवडणूक प्रचार दौर्‍यासाठी स्वराज गुजरात येथे आल्या असून वडोदरा येथे त्या प्रचारसभा घेणार आहेत. स्वराज यांच्या समवेत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे देखील गुजरात येथे दाखल झाले आहेत.

काँग्रेस पक्षाबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून सन २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल; असे भाकीतही स्वराज यांनी केले.

Leave a Comment