किशोर कुमारचा रोल रणबीर करणार

दिग्दर्शक अनुराग बसू कोणतेही काम करीत असेल तरी तो त्याच्या स्टायलने करतो. त्या कामासाठी वेळ लाग्ला तरी तो त्याच्या आवडीनुसारच काम करीत असतो. गेल्या काही दिवसापूर्वी रणबीर कपूर सोबत निर्मिती केलेल्या ‘बर्फी’ सिनेमाच्या बाबतीत असेच काहीसे झाले. हा सिनेमा वेळेत पूर्ण न झाल्याने रिलीज व्हायाला वेळ लागला. येत्या काळात अनुराग आता रणबीर सोबत नवीन सिनेमा करीत असून त्यामध्ये रणबीर किशोर कुमारचा रोल करणार असल्याचे समजते. रणबीरला या रोल तयारी करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ लागणार आहे.

दरम्यान रणबीर तीन लुक्समध्ये तो दिसणार आहे. किशोर कुमारच्या लाइफमधील तीन स्टेज करण्यात येणार आहे. रणबीरसाठी वेट गेन करणे टफ राहणार आहे. किशोर कुमारच्या लुकमध्ये दिसणार आहे. १२ ते १५ किलो वेट कमी करावे लागणार आहे. याबाबत अधिक बोलताना बसु म्हनाला, ‘ कैरेक्टरच्या डिमांडनुसार रणबीरला खूप काही करण्याची संधी आहे. या सिनेमात १९ वर्षाच्या किशोर कुमार पासून ५८ वर्षाच्या किशोर कुमारपर्यंत दिसणार आहे. रणबीरसाठी हे सर्व काही करणे सोपे राहिले नाही.’

या सिनेमासाठी किशोर कुमारचा मुलगा अमित गाइड करणार आहे. बसुला सिनेमा निर्मितीसाठी अमित कुमार मदत करणार आहेत. ‘बेशर्म’ हा सिनेमा पूर्ण केल्यानंतर रणबीर या सिनेमाच्या शुटींगसाठी वेळ देणार आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे.

Leave a Comment