‘सन ऑफ सरदार’ने कमविले १०० कोटी

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ ने भारतातील चित्रपटग्रहात १०० कोटीची कमाई  केली आहे. अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा आणि  संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने १०० कोटीचा आकडा नुकताच पार केला आहे. पहिल्या आठवडयातच या सिनेमाने भारतात ७१.५३ कोटी रुपये कमविले होते. ‘सन ऑफ सरदार’ ने १०० कोटीचा आकडा पार करणारा या वर्षातील आणखीन एक सिनेमा ठरला आहे. 

दुसरीकडे या सिनेमासोबतच १३ नोवेंबर रोजी रिलीज झालेल्या यश चोप्रा यांच्या  ‘जब तक है जान’ या सिनेमाने भारतात १०० कोटीचा आकडा २३ नोवेंबर रोजी पार केला होता. सुरुवातीपासुनच ‘सन ऑफ सरदार’ व  ‘जब तक है जान’ या सिनेमात रेस लागली होती. या दोन्ही सिनेमाच्या रिलीज होण्यापासून काही काळ वाद निर्माण झाला होता. हा वाद पार कोर्टापर्यंत गेला होता. त्यामुळे अजय देवगण व शाहरुख खान यांच्यातील संबध काहीसे बिघडले होते.

अजय देवगणच्या या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाची प्रस्तुति ‘वायाकॉम १८ मोशन पिक्चर’ आणि  ‘इरोज इंटरनेशनल’ ने मिळून केली आहे.  सिनेमा निर्मितीसाठी अजय देवगन फिल्म्स आणि वाईआरवी इंफ्रा एंड मीडिया (पी) लिमिटेड प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन   अश्वनी धीरने केले आहे.

Leave a Comment