वीणा मलिक पुन्हा वादाच्या भोव-यात

वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक नेहमीच काही ना काही वादामुळे चर्चेत असते. सध्या ती एक गरमा-गरम एमएमएस लीक झाला असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा एमएमएसमुळे गेल्या काही दिवसापासून वीणा फारच वैतागली आहे. वीणाचा हा एमएमएस इंटरनेट जगतात सध्या खूप धूम करत असल्याने युवक वर्गात सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे.

बिग बॉसमध्ये अवतरल्यानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा चंग तिने त्यावेळी बांधला होता. मात्र बिग बॉस मधील अश्मित पटेलसोबतचे तिचे काही रोमान्सचे किस्से उघड झाले होते. त्यावेळेस पासून तिची बोल्ड अभिनेत्री म्हणून सगळीकडे ओळख निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात वीणाला बॉलिवूडमध्ये चांगला रीस्पोंस मिळाला होता. त्यामुळे ती यशस्वी अभिनेत्री म्हणून पुढे येईल असे वाटत असतानाच एमएमएस लीक झाला आहे.

वीणा मलिक सध्या एका सी-ग्रेड चित्रपटात काम करते आहे. हा चित्रपट रिलिज होण्याअगोदरच राजन वर्मासोबतचा तिचा गरमा-गरम एमएमएस कुणी तरी लीक केला आहे. वीणाचा हा एमएमएस इंटरनेट व मोबाइलवरही जगतात धूमाकुळ घालत असल्याचे समजते. या एमएमएसचा तिला आगामी चित्रपटासाठी फायदा होतो की तोटा हे येणा-या काही दिवसातच समजणार आहे.

Leave a Comment