रेमोच्या तालावर सिद्धार्थने धरला ठेका

बॉलीवूडची अभिनेत्री विद्या बालन व सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. त्यामुळे ही जोडी अल्पवधीतच फेमस झाली आहे. लग्न जवळ आले असतना विद्याचा भावी पती सिद्धार्थ रॉय कपूर चक्क डान्सचा सराव करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वीच सिद्धार्थ रेमो डिसूजाच्या आगामी ‘एबीसीडी’ या सिनेमाच्या फर्स्ट लूक रिलीजसाठी आला होता. यावेळी रेमोच्या तालावर सिद्धार्थने चांगलाच ठेका धरला. त्याच्या या डान्समुळे फर्स्ट लूक रिलीजसाठी आलेल्या मंडळीची चांगलीच करमणूक झाली. कदाचित यानिमित्ताने सिद्धार्थने स्वतःच्या लग्नात डान्स करण्याची प्रॅक्टीस सुरु केली असावी अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

दिग्दर्शक रेमो डिसूजाचा ‘एबीसीडी’ म्हणजे ‘एनबडी कॅन डान्स’ हा सिनेमा डान्सवर आधारित आहे. सिद्धार्थ रॉय कपूरच्या यूटीव्ही बॅनरखाली हा सिनेमा तयार झाला आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यूटीव्हीचे हेड आहेत. त्यासाठी सिद्धार्थ रॉय कपूर आला होता. यावेळी विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ सिनेमातील गाण्यावर सिद्धार्थने ठेका धरला होता.

येत्या काही दिवसातच सिद्धार्थ आणि विद्या लग्न करणार असल्यचे समजते. त्यामुळेच सिद्धार्थने लग्नात डान्स करण्याचा प्रॅक्टीस सुरु केली असावी अशी चर्चा आहे. त्यामुळे काही दिवसातच लग्नात सिद्धार्थ डान्स करताना दिसनार आहे. यावेळी प्रभू देवा आणि रेमोबरोबर सिद्धार्थने ठेका धरला होता. त्यामुळे सध्या सिद्धार्थच्या या डान्सची चर्चा सुरु आहे.

Leave a Comment