पाकिस्तानात मे मध्ये सार्वत्रिक निवडणूका

लाहोर दि. २८ – पाकिस्तानात मे २०१३ रोजी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील असे माहिती प्रसारण मंत्री कमर झमान यांनी जाहीर केले आहे. पाकिस्तानात निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असून या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलल्या जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात सत्तेवर असलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीने निवडणूका मुक्त खुल्या वातावरणात पार पडतील आणि त्या निपक्षपातीपणे होतील अशी खात्री नागरिकांना दिली आहे. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याची घटना पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच घडते आहे. अनेक वर्षे लष्करी राजवटीत काढलेल्या पाकिस्तानमध्ये आजपर्यंत निवडूकांतून निवडून आलेले कोणतेच सरकार आपला कालावधी पूर्ण करू शकलेले नाही. सध्याच्या सरकारची मुदत १६ मार्चला पूर्ण होते आहे. त्यानंतर ६० दिवसांत मिवडणूका घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मुदतीपूर्वी निवडणूका जाहीर केल्या गेल्या तर त्यासाठी ९० दिवसांचे बंधन आहे असे समजते.

Leave a Comment