इंटेलची नवी प्रोसेसर्स मालिका बाजारात

वॉशिंग्टन: इंटेल या संगणकीय प्रोसेसर्स उत्पादनाच्या आघाडीच्या कंपनीने प्रोसेसर्सची नवी मालिका बाजारपेठेत आणली आहे. या नव्या इटॅनियम ९५०० मालिकेतील प्रोसेसर्सचा वेग या आधीच्या प्रोसेसर्सपेक्षा दुपटीने अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे.

इआरपी अ‍ॅप्लिकेशन्स, डेटा बेस आणि व्यावसायिक विश्लेषणाच्या गरजा लक्षात घेऊन या मालिकेतील प्रोसेसर्स विकसित करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. जगातील आघाडीच्या १०० कंपन्या; तसेच दूरसंचार, हवाई तंत्रज्ञान, उर्जा, विज्ञान या क्षेत्रातील आस्थापनांमध्ये इंटेल प्रोसेसर्स वापरले जातात.

नव्या मालिकेतील प्रोसेसर्सची कार्यक्षमता, वेग आणि उपयुक्ततेत वाढ होणार असून या प्रोसेसर्समुळे विजेच्या खर्चात तब्बल २१ टक्के बचत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.