रामल्लाह: पॅलेस्टाईनचे दिवंगत नेते यासीर अराफात यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह थडग्यातून पुन्हा बाहेर काढण्यात आला. पुढील तपासणीसाठी तो पॅलेस्टाईन अध्यक्षांच्या संकुलातील मशिदीत नेण्यात आला आहे.

अराफात यांचा मृत्यू नैसर्गिक रित्या नव्हे तर विषप्रयोगाने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत निश्चिती करण्यासाठी अराफात यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने त्यांचे दफन केलेले शव पुन्हा काढण्यात आले असून स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि रशियाचे तज्ज्ञ त्याची तपासणी करणार आहेत. पॅलेस्टाईनचे प्रतिनिधीही या तपासणीवर देखरेख ठेऊन आहेत.
तपासणीनंतर अराफात यांचा मृतदेह लष्करी इतमामाने पुन्हा दफन करण्यात येणार आहे.