अंत्ययात्रेत खिसेकापूंची दिवाळी

मुंबई दि.१९ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल निघालेल्या अभूतपूर्व अंत्ययात्रेत खिसेकापू आणि साखळी चोरांनी आपले खिसे चांगलेच गरम करून घेतले असल्याचे समजते. पाकिट, साखळ्या,मोबाईल चोरीच्या २० हून अधिक तक्रारी बाळासाहेबाच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी माहिम, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नोंदविल्या असून माहिम व शिवाजी पार्क पोलिसांनी कांही जणांना प्रत्यक्ष चोर्यात करतानाच रंगेहात पकडले असल्याचेही समजते. म्हणजे खिसे कापणार्यांोना आणि साखळी चोरांना चोरी करतानाच नागरिकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असे सांगण्यात येत आहे.

बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काल वीस लाखांहून अधिक लोक आले होते. बाळासाहेबांची अंत्ययात्रा माहिमकडून शिवाजीपार्ककडे जात असताना अनेक महिलांना गळ्यातील गंठण चोरीस गेल्याचे लक्षात आले. कांही जणांची मोबाईल तर कांही जणांची पाकिटे चोरीस गेली.गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांची ही संधी साधली. मात्र माहिम पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडले त्यातील तीन साखळीचोर तर दोघे खिसेकापू आहेत. शिवाजी पार्क पोलिसांकडेही चोर्याी करणार्यान तिघांना नागरिकांनी ताब्यात दिले. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवाय अशा चोर्यांिच्या वीस तक्रारी पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आल्या आहेत.

Leave a Comment