
ह्युस्टन दि.१९ – भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे दोन साथीदार फ्लाईट इंजिनिअर मालनयेन्को व अकी होशिडे चार महिने अंतराळातील वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणणारे सोयुझ कझाकिस्तानात आज उतरले. सुनीताने यावेळी १२७ दिवस अंतराळात काढले व त्यापैकी १२५ दिवस अंतराळ स्टेशनच्या बाहेर घालविले.
