रेखाची पण डिमांड वाढली

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमधील स्टार मंडळीचा भाव चांगलाच वाढला आहे. विशेष म्हणजे सिनेमात जरी एन्ट्री मिळत नसली तरी पण त्याना छोट्या पडद्यावर व जाहिरातीमध्ये डिमांड असल्याने त्यांनी पण मानधन वाढविले आहे. सध्यस्थितीत त्यामुळेच या स्टार मंडळीने मानधनात भलतीच वाढ केली आहे. एवरग्रीन एक्ट्रेस रेखाने छोट्या पडद्यावरील डान्स शो ‘नच बलिये’ चा जज म्हणून काम करण्यासाठी ७५ लाख रुपये मानधन मागितले आहे. तिचे हे मानधन ऐकून सर्वजन चक्रावून गेले आहेत.

रेखाने ‘नच बलिये’ शो साठी केवळ ७५ लाख रुपये मानधन मागितले नसून त्या सोबतच तिने एक पर्सनल स्टाइलिस्टची व्यवस्था करण्याची डिमांड ठेवली आहे. त्याशिवाय रेखाने जर शोची टीआरपी अपेक्षेपेक्षा वाढली तर त्यांना फीस देखील वाढवून देण्याची अट संयोजकापुढे ठेवली आहे. यापूर्वी ‘नच बलिये’ शोची जज माधुरी दीक्षितने काम पहिले होते. त्यामुळे या शोच्या टीआरपी मध्ये अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली आहे. आता त्याच्या पुढे जर टीआरपी गेली तर रेखाच्या मानधनात वाढ करावी लागणार आहे.

‘नच बलिये’ या शोच्या मेकर्सने गेल्या सीजनमध्ये माधुरी दीक्षितशी संपर्क साधण्यापूर्वी रेखाशी अप्रोच केले होता. मात्र त्यावेळी रेखाने नकार दर्शविल्यानंतर माधुरीला या शो मध्ये घेतले होते. आत रेखाने ‘नच बलिये’ चा जज होण्यास होकार दर्शविला आहे, तर शो मेकर्सना तिची अट मंजूर करावी लागणार आहे.